Tuesday 16 July 2013

-----------मराठी प्रेम कविता--- --------------- माझे प्रेम फक्त तुझ्यासाठी


====असं प्रेम करावं====


असं प्रेम करावं
थोडं सांगावं थोडं लपवावं,
असं प्रेम करावं
थोडं रुसावं थोडं हसावं,
असं प्रेम करावं
गुपचुप फोन वर बोलावं,
कोणाची नज़र पडताच पटकनअगंचाअरेकरावं,
असं प्रेम करावं
जग पुढे चाललं असलं
तरी आपण मात्र थोडं मागेचं रहावं,
फोन, SMS, आणि E-MAILS च्या जगात ही,
आपण मात्र पत्र लिहुन मांडावं,
असं प्रेम करावं
कुठे भेटायला बोलवावं,
पण आपण मात्र उशिरा जावं
मग आपणच  जाऊन sorry म्हणावं,
असं प्रेम करावं
वर वर तिच्या भोळसट पनाची
खूप चेष्टा करावी,
पण तरीही ती तुम्हाला किती आवडते  हे जरूर सांगावं,
प्रेम एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,
असं प्रेम करावंअसं प्रेम करावं ….
त्यासाठीच आयुष्यात एकदा तरी प्रेमात
पड़ाव…….

====♥♥♥ PanKaJJagTaP ♥♥♥====




====तुझ्याच साठी ====


तुझ्याच एका हास्यासाठी,माझे हसणे
अडायचे...
तुझ्याच एका शब्दासाठी, माझे कान
थांबायचे....
तुझ्याच एका श्वासाविणा माझे श्वास
अडायचे....
पण असे का व्हायचे हे माझे मलाच
नाही कळायचे....????
तुझ्याच एका भेटीसठी, मनोमन
तरसायचे...
तुझ्याच एका स्पर्शासाठी शरीर, हे
आसुसायचे...
तुला काही कळू नये असे
जरी वाटायचे,तुझेच विचार मनात
गिरटया घालायचे.....
पण असे का व्हायचे, हे माझे मलाच
नाही कळायचे.....???
तू नसणार हे जाणूनही भर गर्दित, मन
तुलाच शोधायचे.....
तुझे स्वर नसताना देखिल,कान तिकडेच
वळायचे......
तु घरी नसताना देखिल ,पाउल तिकडेच
वळायचे.......
पण असे का व्हायचे, हे माझे मलाच
नाही कळायचे.....



====♥♥♥ PanKaJJagTaP ♥♥♥====



====i love you ====


मला शाह रुख सारखे i love you
म्हणता येणार नाही ..
पण अगदी मनापासून माझे तुज्यावर प्रेम आहे हे
नक्की सांगेन ....
माझ्याकडे सलमान
सारखी body ,किंवा तशी crez
हि नाही ....
पण अगदी ताकदीने
मी तुज्या दुष्मनाना मार्गी लावेल...
मला हृतिक सारखे नाचता हि येत नाही,....
पण अगदी तू म्हणशील तसे आयुष्यभर
तुज्या तालावर नाचेल..
माझ्याकडे शाहीद सारखे लुक्स नाहीत
कि पोरी फिदा होतील..
पण अगदी प्रेमळ हृदय आहे ज्याचावर तू
फिदा होशील ....
मला आमीर सारखे प्रत्येक गोष्टीत
perfection जमणार नाही..
पण अगदी perfect असा जोडीदार
होण्याचा नक्की प्रयत्न करेल..
मला इमरान सारखे रोमान्स करता येणार
नाही...
पण अगदी तुला रोज मधुचंद्र असल्यासारखे
भासेल .....
मला जोहन सारखे कोणी super hot म्हणत
नाही...
पण अगदी super lover म्हणून जरूर ऐकशील..


====♥♥♥ PanKaJJagTaP ♥♥♥====




    ==बरसलो आज शब्दांतुन ==



मी बरसलो आज शब्दांतुन , तीला एकही शब्द
ना कळला कधी!!!!!!!!!!!!
मी ओघळलो आज  डोळ्यांतुन ,
तीचा थेबंही ना गळला कधी..
सोडुन मान सन्मान माझा मीच दगडापुढे हात जोडीले
मी कोसळलो दरड होऊन , तीचा एकही बुरुज
ना ढळला कधी..
मी बसलो बाजार मांडून , तीने भाव
माझा ना विचारला कधी..
आयुष्यभर तीच्या कुपंणाबाहेर जागा माझी नित्याची
मी राहीलो कुंपण बनुन , तीने हा निवडूंग अंगणात
ना लावला कधी..
सा-याच राती तीच्या चादंण्याच्यां मिठीत गेल्या
मी जगलो काजवा होऊन , तीला उजेड
माझा ना दिसला  कधी..
मी राहीलो शिपलं बनुन , माझ्यातला मोती तीने
ना शोधला कधी..
मी होतो पाखरु जळणारा ती ज्योत
होती मला जाळणारी
मी जळालो पाखरु बनुन ,
तिला एकही चटका ना लागला कधी..
मी लाचार इतका की आज माझीच कीव मज यावी
मी मला दिले आगीत झोकून , तीचा धुराकडेही जिव
ना वळला कधी
आता मज नकोच
तिच्या प्रेमाच्या उसण्या त्या थापा
मी चाललो स्वप्न मोडुन , तीने
स्वप्नांतही मला ना सोडला कधी………..


====♥♥♥ PanKaJJagTaP ♥♥♥====





  ♥==premachi katha ==


एक सरिता रागवली
आपल्या boyfriend ला म्हणाली
'हे रे काय सागर !
मीच का म्हणून ?
दर वेळी मीच का
मीच का यायचं खाली डोंगरावरून ?
आणायचं रानावनातलं सारं तुझ्यासाठी
दरी बघायची नाही
कडा बघायचा नाही
कशी सुसाट पळत येते मी
विरहव्याकुळ, संगमोत्सुक
कधी एकदा तुला गच्च मिठी मारीन
तुझ्यात हरवून , हरपून जाईन
आणि तू वेडा
तुझं लक्षच नसतं कधी
सारखा त्या चंद्रिकेकडे टक लावून असतोस.
उसळतोस तिच्यासाठी
तुझ्यासाठी पाणी आणते मी
पण तुला भरती येते तिच्यासाठी
मी नाही जा !
बोलणारच नाही आता.
येणारही नाही.
काठावरच्या लोकांना सांगून
मोट्ठं धरण बांधीन
थांबून राहीन तिथेच.
बघच मग.
सरिताच ती
बोलल्याप्रमाणे वागली.
सागर बिचारा तडफ़डला
आकसला, आतल्या आत झुरत गेला.
शेवटी फ़ुट्ला बांध त्याच्याही संयमाचा
उठला ताड
ओरडला दहाड
उफ़ाळला वारा पिऊन
लाटांचं तांड्व घेऊन
सुटला सुसाट
सरितेच्या दिशेने
लोक येडे.
म्हणाले 'सुनामी आली ! सुनामी आली !!'

====♥♥♥ PanKaJJagTaP ♥♥♥====


        ====प्रेम ====

आजकाल मला तुला छळायला खूप आवडते,
चालता चालता उगाच मागे वळून बघायला आवडते,
मला बघताच
तुझ्या हृदयाच्या वाढणाऱ्या ठोक्यांना ऐकायला
आवडते,
 आणि हळूच एक स्मित हास्य देवून रोज तुझे
काळीज चोरावेसे वाटते...
खूप काही बोलायचे असते,
खूप काही ऐकायचे असते,
तसे तर मला तुला रोजच भेटायचे असते,
रोजच्या या धावपळीच्या जगात,
नवीन आयुष्य जगायला शिकायचे असते,
वेळच अपुरा पडतो ,
नाहीतर मला आयुष्यभर तुलाच ऐकत
बसायला आवडते...♥♥♥


====♥♥♥ PanKaJJagTaP ♥♥♥====



====अधूर स्वप्न====



अपेक्षा तर काहीच ठेवल्या नव्हत्या
माहीत होत त्या कधीच पुर्ण होणार नव्हत्या
म्हणून  त्यांच्या मागेही
कधी वेडी सारखी धावली नाही
पण चूक शेवटी झालीच माझ्या हातून
नाही म्हणता म्हणता शेवटी
एक म्ह्त्वाकांश्या मनाशी बाळगलीच
आणि जे नाही व्हयाच तेच झाल
दूर असूनही जितकं तुला आठवलं नसेल
तितकं तू जवळ आल्यावर तुला शोधलं
एक वेडी अशा व्हती तुझ्या बद्दलची
जी आता हळूहळू पुसटशी होत आहे
सगळच तर विरळ होत आहे
तुज भेटणं, मला शोधणारी तुझी प्रेमळ नजर
आणि कदाचित आता तुज माझ्यावरच
प्रेमही......................
पण, मी हे सगळ नाही विसरू शकत
तू कधी भेटलास नाही तरी ही
आणि तुझी प्रेमळ नजरही
तुझ्या आणि माझ्या
पहिल्या नजरेवर माझ पूर्ण जीवन अपर्ण आह



====♥♥♥ PanKaJJagTaP ♥♥♥====



====आहेच ती अशी ====


आहेच ती अशी...
चेहर्यावर नेहमीच हसू,
पण मनात खूप काही साठलेलं...
आले जरी डोळे भरून,
ते कोणालाही दिसलेलं...
आहेच ती अशी...
सगळ्यांच्या सुख-दुखत, नेहमीच असणारी...
स्वतःलाच विसरून,
सगळ्यानसाठी झटणारी ..
स्वतःच दुखः, कोणालाही दाखवणारी,
अन कोणीही काहीही विचारल,
तरी नेहमीच...
हसून उत्तर देणारी...
आहेच ती अशी...
फक्त त्याच्याच आठवणीत झुरणारी,
तो आहे दूर कुठे तरी..
फक्त त्याच्या येण्याचीच वाट पाहणारी...
नाही तो तिचa, हे जाणून नहि....
फक्त त्याच्याचसाठी जगणारी...
अन दिलेल्या त्या प्रेमाच्या वाचनानं,
आजून हि पाळणारी...
आहेच ती अशी...
कोणालाही कळलेली,
अन कोणालाहि कळणारी...
चंद्राची..............चांदणी जशी....
आहेच ती अशी...
आहेच ती अशी
फक्त तुझ्यासाठीच ........... :)


====♥♥♥ PanKaJJagTaP ♥♥♥====



====तू विसरून गेलास ====


तू प्रेमात पडला आणि माझ प्रेम
बघायला विसरून गेला
तुझी प्रत्येक बडबड ऐकतेय पण मला
जे ऐकायचय ते सांगायला विसरून गेला
मी हो म्हणील कि नाही याचा
तू स्वतःच विचार करून गेलास
फुलणाऱ्या माझ्या प्रेमावर
अशुभ विचार तू करून गेलास
नुसतच बघितलं डोळ्यांमध्ये
प्रेम बघायचं विसरून गेलास
सागायचं बरच काही होत तुला
सागायचं तू विसरून गेलास
विचारणार मी हि होते
पण अडवायचं तू विसरून गेलास


====♥♥♥ PanKaJJagTaP ♥♥♥====


....प्रेम.....

पुन्हा एकदा तिच्या प्रेमात
पडावेसे वाटते...
कोण तो तुझा
म्हटल्यावर झुकलेली नजर
आणि गुलाबी झालेले गाल
बघून
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात
पडावेसे वाटते....

रोज निरोप घेताना
पुन्हा कधी भेटशील
म्हणताना
पाणावलेले डोळे आणि
कपकपनारा कंठ बघून
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात
पडावेसे वाटते....

कारण नसताना तासभर
फोनवर
भांडायच स्वतः राग
करून फोनही ठेवायच.
फोन ठेवल्यानंतर
मिनिटात आलेला
आय लव यु चा मँसेज बघून
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात
पडावेसे वाटते....

नकळत स्पर्श झाल्यावर
तिच्या हृदयाचा चुकणारा
ठोका
आणि थरथरणारे ओठ बघून
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात
पडावेसे वाटत....
====♥♥♥ PanKaJJagTaP ♥♥♥====
 

15 comments :

  1. Hi
    I am varshadeepak ,i like all stories

    ReplyDelete
  2. nice lines............premkavita....................khupch chan aahet

    ReplyDelete
  3. Nice yar. Khup touching poems ahet.

    ReplyDelete
  4. Tujhya kavita khup chaan aahet.

    ReplyDelete
  5. Mi pan khup prem kel manapasun ti pan khup prem karat hoti pan mala mahit navate tiche prem aahe tari kase mi 5diwas ann n khata pani pit rahalo pan ti mane tu maza navata

    ReplyDelete
  6. Khup mast ....kavita aaiklyawarach prem hou lagla....

    ReplyDelete
  7. Khup Chan Kavita ahe.touch the ��

    ReplyDelete
  8. Plz add new poems or msg on love

    ReplyDelete